आता ‘महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ’ आणि ‘मेहेअर’ यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या मुंबई ते पवना धरण या मार्गावरील ‘सीप्लेन’ सेवेला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जुहूपासून मुळा धरण अशी नवीन सेवा सुरू करण्यात येत आहे. मेहेरेबाद, शिर्डी आणि शिखर शिंगणापूरला जाणाऱ्या मुंबईकरांना या ‘सीप्लेन’ सेवेचा लाभ होणार आहे.
मुंबईहून रोज सकाळी साडेआठ वाजता विमान निघेल. तर दर गुरुवारी आणखी एक जादा विमान दुपारी दोन वाजता सोडले जाईल. राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी यासारखे आणखी काही उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंग यांनी सांगितले.