देवीची अनेक रूपं आहेत. कधी ती दुर्गेच्या रूपात असते, कधी ती महिषासुरमर्दिनी असते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’तर्फे यंदा ओळख करून दिली जाणार आहे ती तुमच्या आमच्यातील दुर्गाची. आपल्या अवतीभवती आपल्याला अनेक दुर्गा दिसतात. आजच्या काळातली स्त्री ही देवीच्या अशाच अनेक रूपांना आपल्यामध्ये बाणवत आयुष्यातल्या आव्हानांना सामोरी जात असते. यशस्वी होत असते. येत्या नवरात्रात ‘लोकसत्ता’ आजच्या स्त्रीमधल्या देवींच्या अशाच विविध रूपांचे दर्शन ‘शोध नवदुर्गा’चा या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला घडविणार आहे. यासाठी आजवर समाजापुढे न आलेल्या अशा दुर्गाची माहिती कळविण्यासाठी आवाहन करण्यात
आले आहे.  
त्यातल्या कोणी अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे, कोणी स्वाभिमानी बाण्याने सामाजिक अत्याचारांविरोधात लढत आहे,  तर कुणी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत उच्चपद प्राप्त केले आहे. तर कोणी कौटुंबिक पाश्र्वभूमी नसतानाही आव्हानांना तोंड देत एखाद्या क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवून उभी आहे. त्यातून प्रेरणा मिळेल, हा विश्वास असल्यानेच ‘लोकसत्ता’ने ‘अभ्युदय बँके’च्या सहकार्याने हा आगळा उपक्रम हाती घेतला. नोकरी करणाऱ्या असतील वा सामाजिक कार्यकर्त्यां वा गृहिणी असतील. ओळख असलेल्या अशा ‘दुर्गे’ची माहिती वाचकांनी तिच्या छायाचित्रासह व आपल्या संपर्क क्रमांकासह ‘लोकसत्ता’कडे पाठवावी. त्यातून नऊ दुर्गाची निवड केली जाणार असून नवरात्रींच्या दिवसात ती प्रसिद्ध
केली जाईल. शब्दमर्यादा ५०० असून पाकिटावरवा ईमेल करताना सब्जेक्टमध्ये ‘शोध नवदुर्गाचा’ लिहिवावे ही माहिती
कुरिअरद्वारा ‘प्लॉट क्र. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल परिसर, महापे नवी मुंबई durga.loksatta@expressindia.com  या ईमेलद्वारा ‘लोकसत्ता’ महापे कार्यालयात पाठवू शकता.