गोकुळाष्टमी म्हणजेच दहीहंडी. यानिमित्ताने गोविंदा गल्लोगल्ली जाऊन हंडी फोडण्याचा आनंद मनसोक्तपणे लुटत असतात. सवंगडय़ांसोबत दंगामस्ती करणारा हा माखनचोर स्मितहास्याने सर्वाचे मन मोहून टाकत असतो. म्हणूनच गोकुळाष्टमीच्या निमित्ताने डोक्यावरील मुकुटामध्ये मोरपीस खोवून आणि हातात बासरी घेऊन हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेल्या तुमच्या लाडक्या कृष्णराजाचे फोटो आम्हाला loksatta.express@gmail.com या ई-मेलवर ७ सप्टेंबरपर्यंत पाठवा. सबजेक्टमध्ये ‘आमचा माखनचोर’ लिहिण्यास विसरू नका.
मेलमध्ये आपल्या छकुल्याचे आणि स्थळाचे नाव अवश्य लिहा. निवडक फोटोंचा अल्बम ‘लोकसत्ता डॉट कॉम’वर प्रसिध्द केला जाईल. त्याचप्रमाणे या अल्बमची लिंक लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरही शेअर केली जाईल. याशिवाय तुम्ही पाठविलेल्या फोटोंपैकी सर्वोत्कृष्ट फोटोला लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर कव्हर फोटो होण्याची संधी मिळेल.