पोलिसांवरील कामाचा वाढता ताण आणि यातून होणाऱ्या आपापसातील वादाच्या प्रकारांनी शनिवारी वाकोला पोलीस ठाण्यात धक्कादायक कळस गाठला. वाकोला पोलीस ठाण्यात शनिवारी धक्कादायक घटना घडली. साहाय्यक फौजदाराने वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांच्या वायरलेस ऑपरेटर शिपायावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या गोळीबारात वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
shooting-1
 न सांगता घेतलेल्या रजेची नोंद पोलीस ठाण्यातील डायरीत केल्याने संतापलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिर्के यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी व त्यांचे ऑर्डर्ली बाळासाहेब अहेर यांच्यावर गोळ्या झाडून नंतर आत्महत्या केली.  जोशी यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्यादरम्यानत त्यांचा मृत्यू झाला.
काय घडलं?
* दिलीप शिर्के यांनी शुक्रवारी न सांगता सुटी घेतली. या प्रकाराची नोंद रात्रपाळीच्या पोलीस निरीक्षकाने डायरीत केली.
* शनिवारी कामावर आल्यावर शिर्के यांना ही गोष्ट कळताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांना जाब विचारला. त्यातून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी.
* जोशी घरी जायला निघताच शिर्के यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी हाताला लागताच ते खाली कोसळले. ते उठण्याच्या प्रयत्नात असताच शिर्के यांनी झाडलेली दुसरी गोळी शरीरातून आरपार गेली.
* गोळय़ांचा आवाज ऐकून ऑडर्ली अहेर यांनी धाव घेतली तेव्हा त्यांनाही एक गोळी लागली.
* यानंतर शिर्के यांनी डोक्यावर गोळी झाडून घेतली.