महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक संघटना, शब्द साहित्य मंडळ, सद्गुरू शिक्षण आणि बहुउद्देशीय संस्था, शब्द मराठी कविता समूह फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ७ मे या कालावधीत बँकॉक येथे ‘शब्द मराठी विश्व साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेते व कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.
‘शब्द’ स्मरणिकेचे प्रकाशन, परिसंवाद, कवी आणि गझल संमेलन, पुस्तक प्रकाशन, प्रकट मुलाखत आदी विविध कार्यक्रम संमेलनात होणार आहेत. आतापर्यंतची शब्द मराठी साहित्य संमेलने वर्धा, पुणे, नागपूर आणि अलिबाग येथे आयोजित करण्यात आली होती. बँकॉक येथे होणारे मराठी विश्व साहित्य संमेलन राज्य शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय आयोजित केले जाणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक संजय सिंगलवार आणि प्रभाकर वानखेडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.