विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गांभीर्याने घेतला असून, उद्यापासून दोन दिवस विजयी आणि पराभूत उमेदवारांकडून जिल्हानिहाय  आढावा घेणार आहेत.  पवार हे शनिवारी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील पक्षाचे उमेदवार तसेच जिल्हाध्यक्षांकडून जिल्हानिहाय आढावा घेतील. रविवारी मराठवाडा, कोकण व उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत. प्रत्यक्ष उमेदवारांकडूनच राजकीय परिस्थितीची माहिती घेण्यावर पवार यांनी भर दिला आहे. राष्ट्रवादीची चौथ्या क्रमांकावर घसरण झाल्याने पक्षाने फारच गांभीर्याने घेतले आहे. पुढील निवडणुकीपर्यंत पक्षबांधणी आणि पक्षाचा पाया अधिक विस्तृत करण्याचा प्रयत्न आहे.