रोजगारनिर्मितीसाठी पोषक वातावरणनिर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याच्या वास्तवाला केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी नुकतीच एका कार्यक्रमावेळी मान्यता दिली. यामुळे आपल्या पुढील आर्थिक आव्हानाचे गांभीर्य कळत असून सरकारने केलेले दावे आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव यांत भीषण तफावतही लक्षात येते.

रूडी यांचे हे वक्तव्य आणि आपल्या इथली शिक्षणव्यवस्था यांच्यावर आज प्रसिद्ध झालेल्या रोजगारशून्यतेचे ‘राजीव’ दर्शन या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.