शीना बोरा हत्येबाबत पोलिसांचा खुलासा
शीनाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाला इंद्राणीने ‘मेकअप’ करून सजवले आणि मग विल्हेवाट लावण्यासाठी पेणच्या जंगलात नेले होते. दरम्यान, गागोदे गावात सापडलेल्या कवटय़ा आणि हाडावंर स्पेशल सुपर इंपोजिझन प्रक्रिया झाली असून तो मृतदेह शीनाचाचा असल्याचा अहवाल नायर रुग्णालयातल्या तज्ज्ञांनी दिला आहे. शीना बोराची हत्या नेमकी कशीे झालीे त्याचा अधिकृत खुलासा शुक्रवारी मुंबई पोलिसांनी केला.
ती कवटी शीनाचीच
गागोदे गावात सापडलेली कवटी आणि गालाच्या काही हाडांच्या आधारे नायर रुग्णालयात स्पेशल सुपर इंपोझिशन प्रक्रिया करण्यात आली. त्या चाचणीतून उलगडलेला चेहरा शीनाच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे. ती हाडे २३ ते २५ वर्षे वयोगटातील महिलेचीे असल्याचे तज्ञांनी अहवाल दिला. हा एक महत्वाचा पुरावा मानला जातोय. याशिवाय सिद्धार्थ दास, इंद्राणीे आणि मिखाईल यांचे डिएनए नमुने सुद्धा या हाडांशीे जुळवून पाहिले जाणार आहे.
शीनाचीे हत्या केल्यानंतर इंद्राणीने तिच्या कार्यालयातील एका महिलेच्या मदतीने शीनाचे बनावट ई-मेल खाते बनवले होते. त्या खात्यातून तीे शीेनाच्या नावाने ईमेल पाठवत होते. ते मेल्स पोलिसांनी तपासले असून बहुतांश मेल लंडनहून केले गेले होते हे स्पष्ट झाले आहे. मिखाईलला इंद्राणीे दरमहा खर्चाला ४० हजार रुपये नियमित पाठवत होती. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा पीटर मुखर्जी यांची चौकशी करण्यात आली तर संजीव खन्ना आणि इंद्राणीची मुलगी विधीलाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. दरम्यान, मला शीना आणि मिखाईल पासून धोका असल्याचा दावा इंद्राणीने चौकशीदरम्यान केला. शीनाचा पिता सिद्धार्थ दासचीही चौकशी करण्यात आली.
* २४ एप्रिल रोजी इंद्राणीने शीनाला वांद्रे येथून गाडीत बसवले. त्यानंतर काही वेळातच नॅशनल महाविद्यालयाच्या गल्लीत गाडी नेली.
* चालक श्यामवर रायने तिचे पाय धरले तर संजीव खन्नाने तिचा गळा दाबून हत्या केलीे.
* त्या रात्री गाडीतच शीनाचा मृतदेह ठेवला आणि गाडी गॅरेजमध्ये ठेवली.
* दुसऱ्या दिवशीे पहाटे इंद्राणीने शीनाच्या मृतदेहाला परफ्युम लावून, चेहऱ्याला पावडर, लिपस्टिक लावून केस विंचरले. त्यानंतर तिचा मृतहेह रायगडला नेला.
* गाडी श्यामवर राय चालवत होता. तर शीनाच्या मृतदेहाला मागील सीटवर संजीव खन्ना आणि इंद्राणीेच्या मध्ये बसवले होते. ही गाडी जप्त करण्यात आली आहे.