भारत-पाकिस्तान संबंधावर खुर्शिद महमूद कसुरी यांचे भाष्य; शिवसेनेच्या विरोधानंतरही बंदोबस्तात पुस्तकाचे प्रकाशन

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी इतिहासाचा खून पाडण्याचेच काम बहुतांश वेळेस केले आहे. इतिहासाचा खून पाडला की, त्याची जबर किंमत मोजावी लागते. तीच आपण सारे मोजत आहोत. मात्र या दोन्ही देशांतील सामान्य नागरिकांच्या हृदयात सौहार्दाचीच भावना असल्याचे आजवर अनेक घटनांमध्ये लक्षात आले आहे. ही भावना पुढे नेत दोन्ही देशांच्या नेत्यांनी त्यावर संवादाचे सेतू बांधायला हवेत, असे मत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

ऑब्जव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने ‘नायदर अ हॉक, नॉर अ डोव्ह’ या कसुरी लिखित पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा मुंबईत आयोजिण्यात आला होता. या सोहळ्याला विरोध दर्शवत सोमवारी सकाळीच शिवसैनिकांनी ओआरएफचे संचालक सुधींद्र कुलकर्णी यांची गाडी अडवत त्यांच्यावर ऑईल पेंटचा काळा डबा रिकामा केला. कुलकर्णी यांनी त्याच अवस्थेत कसुरींसोबत पत्रकार परिषद घेतली. त्याप्रसंगी कसुरी  म्हणाले, मी स्वत आयुष्यभर राजकारण केले आणि राजकीय कार्यकर्ता होतो. राजकारणात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा, प्रसंगी निषेध व्यक्त करण्याचाही अधिकार आहे मात्र तो कायदेशीर मार्गानेच व्यक्त व्हायला हवा. सुधींद्र कुलकर्णी यांच्याबाबतीत घडलेली गोष्ट ही निषेधार्हच आहे.

पाकिस्तानात लाहोरमध्ये भारतीय संघ क्रिकेट सामना जिंकला त्याचा आनंद पाकिस्तानी नागरिकांनीही दोन्ही देशांचे झेंडम्े फडकवून व्यक्त केला होता, तिथे काहीच आपत्ती नव्हती, असेही ते म्हणाले.

मुंबईशी आपले वेगळे नाते आहे. वडिलांनी याच मुंबईत ‘छोडो भारत’ आंदोलनात उडी घेतली होती. इथली हिंदूी, उर्दू, हिंदूुस्थानी ही सिनेमाची भाषा आज दक्षिण आशियातील समानतेचा धागा आहे. भारत- पाक शांतता प्रक्रियेबद्दल ते म्हणाले की, वाजपेयी यांच्या काळात २००४ साली या प्रक्रियेस सुरुवात झाली. डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात तीच प्रक्रिया पुढे नेण्याचे काम केले. आजवरची ती २००४ ते २००७ ही सर्वाधिक यशस्वी ठरलेली शांतता प्रक्रिया होती. दोन्ही देशांतील सामान्य माणसाच्या मनात सौहार्दाचीच भावना आहे. नेत्यांनी ती संवादाच्या माध्यमातून पुढे नेण्याची गरज आहे. एक विशिष्ट विद्वेष मुद्दामहून पसरवला जात आहे. तो टाळण्यासाठी संवाद व शांतता हव्या असलेल्या सरकारांनी खुश्कीच्या मार्गाने एकमेकांशी संवाद साधायला हवा .

आपण परराष्ट्र व्यवहार मंत्री असतानाच समझौता एक्स्प्रेसचा स्फोट झाला होता. मात्र अशा घटनांनी न घाबरता आपण शांतता प्रक्रिया सुरूच ठेवली पाहिजे. आता पाकिस्तानी लष्करातही बदलाचे वारे वाहत आहेत. त्यांनीच त्यांच्या तीन सैन्यदल प्रमुखांवर कोर्ट मार्शलचे खटले चालवले आहेत. शिवाय आता १४ वर्षांंच्या मुलांचा वापर आत्मघातकी पथकात होतो आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक त्यांना परावृत्त करण्यासाठी केली आहे. ही सारी चांगली पावले आहेत. सध्या भारत- पाक विसंवाद वाढलेला असताना हीच वेळ मिळाली का, पुस्तक लिहायला असा प्रश्नही काही जणांनी केला पण मी या पुस्तकासाठी चार वर्षे खर्ची घातली असून यापेक्षा चांगली वेळ संवादासाठी असूच शकत नाही, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

हाफिजबाबत उत्तर टाळले

तालिबानबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर ते म्हणाले की, दक्षिण वजिरास्तान आदी ठिकाणी त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली आहे, त्या बाबत न बोललेलेच अधिक बरे. याच प्रकरणात स्थानिक सरकारलाही असे लक्षात आले आहे की, जेव्हा जेव्हा ते त्यांचे अधिकार वापरत नाहीत तिथे त्यांना झुकण्याशिवाय पर्याय नसतो. पण अधिकार वापरले की, दहशतवाद्यांच्या नाडय़ाही त्यांच्या हातात असतात. २६/११ चा हल्ला दुर्देवी होता, असा उल्लेख करून कसुरी म्हणाले की, या हल्ल्यातील प्रमुख आरोपी असलेल्या हाफिज सईदला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याबाबत आपण काही बोलणे उचित नसेल, असे म्हणत त्यांनी थेट उत्तर टाळले.

‘हिंदू सुरक्षित’

पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये हिंदूूंची संख्या अधिक आहे. पाकिस्तानातील आघाडीचा फॅशन डिझायनर हिंदूू आहे, सर्वाधिक प्रथितयश वकीलही िहदूच आहे. एक मुख्य न्यायाधीशही हिंदूू होते, त्यामुळे हिंदूूंनी तिथे घाबरण्याचे काहीच कारण नाही, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.