धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या पुनर्विकासाबाबत एमएमआरडीएने एका स्वयंसेवी संस्थेशी केलेल्या करारास शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे.
हे उद्यान एका बडय़ा कंपनीच्या घशात घालण्याचा प्राधिकरणाचा हा डाव सरकारने हाणून पाडावा आणि या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. एवढेच नव्हे तर हा करार रद्द झाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही धारावी बचाव आंदोलनाचे नेते आणि माजी आमदार बाबूराव माने यांनी दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मुख्य सचिवांनी एमएमआरडीएकडून खुलासा मागितला आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या अडचणीत भर पडली आहे. याबाबतचे वृत्त लोकसत्ताने दिले होते.