25 September 2017

News Flash

बुलेट ट्रेन राष्ट्रीय गरजांमध्ये बसते का?; शिवसेनेचा मोदींना सवाल

शिवसेनेचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 9:11 AM

पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’ प्रकल्पाच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम आज संपन्न होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदींना त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शुभेच्छा देत या प्रकल्पामुळे मुंबईची लूट होऊ नये, अशी अपेक्षा शिवसेनेने ‘सामना’मधून व्यक्त केली. बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल, असे सांगणारे थापा मारत असल्याचा प्रहारदेखील शिवसेनेने केला आहे. यासोबतच बुलेट ट्रेन राष्ट्रीय गरजांमध्ये बसते का, असा सवालदेखील उपस्थित केला आहे.

‘पंडित नेहरूंनी भाक्रा-नांगलपासून भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरपर्यंत अनेक सार्वजनिक उपक्रमांचा पाया घातला. देश तंत्रज्ञान, विज्ञानात पुढे जावा यासाठी अनेक योजनांची पायाभरणी केली. कारण ती सर्व देशाची गरज होती. १४ सप्टेंबरच्या मुहूर्तावर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शिलान्यास होणार आहे. मोदी यांचे हे स्वप्न आहे व पंतप्रधानांचे स्वप्न हे देशाचे स्वप्न आहे. त्यांच्या स्वप्नाला विरोध करण्याचा कर्मदरिद्रीपणा आम्ही कदापि करणार नाही. कारण पंतप्रधान जे करीत आहेत ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवूनच करीत आहेत,’ असे म्हणतानाच ‘राष्ट्रीय गरजांत जपानची अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन बसते काय?’, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

‘मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनचा साफ बोजवारा रोज उडत असला तरी आता अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन धावणार आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणातील अनेक रेल्वे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडून पडले आहेत. महाराष्ट्राचे आमदार-खासदार त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पांबाबत मागण्या करीत आहेत. त्या तशाच अधांतरी ठेवून ‘बुलेट ट्रेन’ न मागता मिळत आहे,’ अशा शब्दांमध्ये शिवसेनेने मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर निशाणा साधला. बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या छाताडावरूनच धावणार आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

बुलेट ट्रेनमुळे रोजगारनिर्मिती होईल, असा दावा पंतप्रधान मोदी आणि भाजपने केला होता. त्याचाही समाचार शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. ‘बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल, असे सांगणारे थापाच मारत आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि काम सुरू असताना जपानची कंपनी खिळ्यापासून रुळापर्यंत, खडीपासून सिमेंटपर्यंत सर्व तंत्रज्ञान त्यांच्या देशातून आणणार आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यास जपानी कंपनीने विरोध केला आहे. त्यामुळे जमीन आणि पैसा महाराष्ट्राचा व गुजरातचा; लाभ मात्र जपानचा होणार आहे,’ अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रडणाऱ्या सरकारला बुलेट ट्रेनचा खर्च परवडतो, असे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही समाचार घेतला. ‘बुलेट ट्रेनसाठी १ लाख ८ हजार कोटी केंद्राला खर्च करावे लागतील व महाराष्ट्राला त्यातले किमान ३० हजार कोटी रुपये नाहक द्यावे लागतील. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही लढा उभा केला. तेव्हा कर्जमुक्ती केली तर राज्यात अराजक माजेल आणि अराजक माजावे अशी काही लोकांची इच्छा असल्याचा गळा मुख्यमंत्र्यांनी काढला होता. मग आता पंतप्रधानांच्या ‘श्रीमंत’ स्वप्नासाठी ३० ते ५० हजार कोटी रुपये टाकत आहात. त्यामुळे अराजक माजणार नाही काय, याचे उत्तर मिळायलाच हवे,’ असे शिवसेनेने म्हटले आहे.

First Published on September 14, 2017 9:11 am

Web Title: shivsena slams pm narendra modi over mumbai ahmedabad bullet train
 1. V
  Vijay Amin
  Sep 14, 2017 at 9:00 pm
  मुम्बई मेट्रो 2 रखडली नसती तर बुलेट ट्रेन झाली नसती. रोज मीरा रोड ते अंधेरी अडीच तास लागले नसते.....कोण जवाबदार? सोनू की शायनु?
  Reply
  1. S
   sanjay telang
   Sep 14, 2017 at 8:25 pm
   सेनेनी बुलेट मारली, कोणाच्या खांद्यावर बंदूक माहित नाही. खरंच आहे, जलदगती ट्रेन नको, हे बरोबर आहे. फडणवीसांना त्रास नको मेट्रोचा , म्हणून एवढे मोठाले खड्डे करून ठेवलेत कि मेट्रोचे कामही फास्ट व्हायला मदत. केवढीहि दूरदृष्टी?? वा वा. पण सेनेने विमान सेवेवरही हल्ला करावा. तिथे त्यांची कामगार युनियन असेल तरीही. कारण तुमचे खासदार जाऊ शकत नाहीत तर देश काय प्रगती करणार?? त्यापेक्षा शेतकऱ्यांचा कैवार घेऊन बैल ी चालू करायला पाठपुरावा करावा. बैलांमुळे त्याला चारा खायला घालायला दुकाने काढून रोजगार वाढवावा, चाकांसाठी सुताराने कामे द्यावीत , बैलांचे नाल ठोकायला लोहारांना काम मिळेल, ह्या सगळ्या कामकऱ्यांसाठी वडापाव व झुणका भाकर केंद्रे सुरु करावी. ताट साफ करायला लोकांना परत काम. सगळ्यांना काम म्हणजे केवढा विकास आणि प्रगती. ह्यांचा पंतप्रधान झाला तरच देश सुपरपॉवर होणार. नाही तर गरिबांचा कैवार घेणारे उरलेत कोण ?? बाकीचे सारे कैसे पैसे खाऊ.
   Reply
   1. P
    prakash yadav
    Sep 14, 2017 at 8:20 pm
    स्वता पन्नास लाखाची ी वापरणार आणि दुसऱ्यांना उपदेश देणार
    Reply
    1. P
     prakash yadav
     Sep 14, 2017 at 8:19 pm
     स्वता पन्नास लाखाची ी वापरणार आणि दुसऱ्यांना उपदेश देणार
     Reply
     1. D
      Dili[
      Sep 14, 2017 at 8:11 pm
      बुलेट ट्रेन प्रोजेक्ट बी एम सी ला द्या . म्हणजे शिवसेना ला कमिशन मिळेल . युद्धात ठाकिरांना मातोश्रीं३ बांधता येईल . भिकाऱ्यांना भीक द्या प्लीझ .
      Reply
      1. M
       Mahesh
       Sep 14, 2017 at 8:06 pm
       एक तर राष्ट्रीय प्रश्नात बुधुने नाक खुपसू नये. आणि मग काय जन्मभर वडा-पाव विकत आणि भांडी घासत बसायचे का? बुधु आणि राऊत लै बोरं मारायलेत आजकाल आणि मोदी विरुद्ध म्हणून लगेच प्रसिद्धी मिळणार !
       Reply
       1. P
        Punekar
        Sep 14, 2017 at 7:10 pm
        Shivsenene news paper madhe comment Denya peksha high court madhe pe ion dakhal karun dakhawawe behalf of MARATHI people
        Reply
        1. P
         Punekar
         Sep 14, 2017 at 7:06 pm
         Maharashtrat baherche lok etke ka yetat ani paya pasartat hyacha wichar wala pahije. Nahitar aplya state madhe apanach parkhe honar south indian stand ghetala pahije Pune pan haul haul Gujarat maya hote ahe...
         Reply
         1. A
          anand
          Sep 14, 2017 at 6:35 pm
          असले प्रश्न शिवसेनेलाच कसे पडतात. आपल्याला कळत नाही तिथे वक्तव्य नको.
          Reply
          1. P
           Paramar
           Sep 14, 2017 at 5:47 pm
           पेंगवीन राष्ट्रीय गरज मध्ये बसत असेल तर बुलेट ट्रेन पण बसते !!!
           Reply
           1. M
            Mohan Madwanna
            Sep 14, 2017 at 5:38 pm
            जर बाळासाहेबांचे स्मारक बसलं असल्यास बुलेट ट्रेन बसेल
            Reply
            1. वैभव
             Sep 14, 2017 at 3:12 pm
             आठ थांबे गुजरात मध्ये आणि चार महाराष्ट्रात तरीही दोन्ही राज्ये २५ टक्के खर्च करणार. कोणता अडाणी मराठी राज्यकर्ता हा असला व्यवहार करेल. सेनेला हव्या तेवढ्या शिव्या घाला पण ह्या महाराष्ट्र भाजपने मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणूस गुजरात्यांना विकला हे सत्य आहे. भविष्यात ह्याचे महा भयानक परिणाम महाराष्ट्र आणि मराठी माण भोगावे लागणार हे नक्की.
             Reply
             1. N
              Nanda Ambore
              Sep 14, 2017 at 3:05 pm
              सादी मुंबईची नाले सफाई आणि रस्त्यातले खडे बुझावता येते नाही , हे साले का तोड उघडतात . आपलय गोळीत आधी बघा .
              Reply
              1. D
               Diwakar Godbole
               Sep 14, 2017 at 2:38 pm
               सतत विरोध करत राहणाऱ्या आणि सत्तेची उब चाखत बसलेल्या शिवसेनेच्या दळभद्री राजकारणाची महाराष्ट्राला गरज आहे का?
               Reply
               1. R
                rajendra
                Sep 14, 2017 at 2:28 pm
                उठाजी , तुम्ही नको ती उठाठेव करू नका फक्त मुंबई कडेच आपले सगळे ध्यान द्यावे. मातोश्री१ ठीकठाक असतानाही मातोश्री२ ची आपणास गरज काय, तसेच दोन्ही मातोश्रींमध्ये तळघरातून भूयारी मार्ग आखले असतीलच तर त्याचीही गरज का ाईनगदी ची निकड ? आपल्या युवराज पुत्राच्या हट्टा पाई त्या बिचार्या पेंग्विनांचा जीव घेण्याचीहि आपणास गरज होती काय हो फुकाचे राजे ! असे काही सवाल जर समस्त मुंबईकरांनी आपणास विचारेल तर आपले तोंड लपवून पळता भुई थोडी होईल ह्याची खात्री !!
                Reply
                1. N
                 neal
                 Sep 14, 2017 at 2:24 pm
                 राष्ट्रीय गरजांमध्ये नाही पण राष्ट्रीय गाजरांमध्ये बसते :)
                 Reply
                 1. Y
                  yashwant
                  Sep 14, 2017 at 1:39 pm
                  त्या बुलेट ट्रेन मधून अजून हर्षदमेहता केतनपारेख नसेल_जिग्नेश शाह BPO _शागी ठक्कर भरत शाह अमित शाह या सारखे गुज्जू लौकर मुंबईत लुटायला पोहचण्यासाठी हि ट्रेन आहे या ट्रेन चा मराठी माणसांसाठी काहीच उपयोग नाही गुज्जू भाई वर वचक ठेवला पाहिजे खूप नालायक जमात आहे
                  Reply
                  1. J
                   jitendra
                   Sep 14, 2017 at 12:27 pm
                   तीन तास झाले प्रतिक्रिया देऊन.....किती दिवसांनी छापणार ? कि भाजपच्या विरोधात आहे म्हणून नाही छापायची ?
                   Reply
                   1. M
                    Mahesh
                    Sep 14, 2017 at 11:55 am
                    Penguin mumbaichya garajet basatat vatata
                    Reply
                    1. उर्मिला.अशोक.शहा
                     Sep 14, 2017 at 11:50 am
                     वंदे मातरम- विघ्न संतोषी उपद्रवी या पेक्षा वेगळा विचार करू शकणार नाहीत. बुलेट ट्रेन मुळे व्यवसायाची हजार पटीने वाढ होणार आहे आमदावाद आणि मुंबई व्यतिरिक्त जेथे थांबा असेल त्या शहराचा हि भरपूर विकास होणार आहे म्हणजे च रोजगार उपलब्ध होणार आहे. ज्यांना मुंबई ची गटारे नीट साफ करता आली नाहीत आणि ज्यांनी महापालिकेलाच साफ केले त्यांनी डोके चालवू नये कारण मेंदू शेंगदाण्या इतकाच असावा.मुंबई शहराचे सर्वाधिक नुकसान परिवार राजकारण मुळे च होणार आहे मुंबईकरांना अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे. आणि पाश्च्याताप हि होत आहे. एका दिवट्याने अमेरिकेत जाऊन परिवार राजकारण चा झेंडा रोवला आहे त्यांचे बरोबर घरोबा करावा आता या पुढे जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल जा ग ते र हो
                     Reply
                     1. S
                      Sandeep V
                      Sep 14, 2017 at 11:48 am
                      गुजराथ मध्ये सात थांबे आणि महाराष्ट्र मध्ये केवळ दोन. कोणाची सोय होणार ते तुम्हीच ठरवा सुटे भाग महाराष्ट्र मध्ये थोडेच बनतात? ते तर गुजरात मध्येच बनतील.
                      Reply
                      1. Load More Comments