खाद्यपदार्थाच्या बाबतीत दुकानदारांशी असलेलं आपुलकीचं आणि विश्वासाचं नातं अधिक महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच अनेकदा ठरावीक ठिकाणांवरून वर्षांनुर्वष काही वस्तू या डोळे झाकून खरेदी केल्या जातात. आनंदाच्या किंवा उत्सवप्रसंगी तर विशिष्ट पदार्थाची खरेदी त्याच ठिकाणांहून केली जाते. याच पंक्तीत अगदी चपखल बसेल असे एक नाव म्हणजे श्री रघुवीर स्टोअर्स.

गेली पंचवीसहून अधिक वष्रे चंद्रशेखर इंदुलकर यांनी पाल्रेकरांचा विश्वास संपादन करत रघुवीर स्टोअर्सची ओळख जपली आहे. मुलगी-मुलगी शाळेत उत्तीर्ण झाल्यावर, कार्यालयात बढती मिळाल्यावर, लग्न, बारसं, दिवाळी, संक्रात किंवा संकष्टी अशा प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी आणि दिवशी पाल्र्यातील घरांमध्ये रघुवीर स्टोअर्समधील कुठला ना कुठला तरी पदार्थ हा आवर्जून आणला जातो.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी

चंद्रशेखर यांचे वडील श्रीधर यांनी १९५२ साली पाल्र्यात स्टेशनरीचं दुकान सुरू केलं. १९८३ साली दुकानाची जबाबदारी चंद्रशेखर यांच्या खांद्यावर आली. आपल्या दुकानात लोक येतातच पण लोकांनी रोज आपल्या दुकानात यावं या दृष्टिकोनातून त्यांनी आईच्या मदतीने चिवडा, चकली असे खाद्यपदार्थ ठेवायला सुरुवात केली. १९९१ सालापासून स्टेशनरीला पूर्णपणे रामराम ठोकून फक्त घरगुती चवीचे खाण्याचे पदार्थ विकून पाल्रेकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्याचं काम रघुवीर स्टोअर्स प्रेमाने अव्याहतपणे करत आहे.

इथे चिवडा, चकली, कडबोळे, अनारसे, शंकरपाळ्या, तिखट शेव, चिरोटे असे फराळाचे पदार्थ वर्षभर मिळतात. भाजणीची चकली आणि कडबोळे, चिवडा, अनारसे, करंज्या या पदार्थाना दिवाळीमध्ये विशेष मागणी असते. बटाटय़ाचा सळी चिवडा आणि वेफर्स तर खास पसंतीचे. व्हॅनिला क्रीम असलेली खुसखुशीत चॉकलेट शंकरपाळी हा प्रकार चार महिन्यांपूर्वीच दाखल झाला आहे. ओट्स, तांदूळ अशा वेगवेगळ्या पिठांचं आवरण असलेला हा पदार्थ लहान मुलांच्या विशेष पसंतीस उतरतो आहे. सर्व पदार्थ पहिल्याच तेलात तळण्याचा चंद्रशेखर यांचा अट्टहास असतो. त्यामुळे पदार्थाची चव टिकून तर राहते आणि ते आरोग्यालाही अपायकरक ठरत नाहीत. इथल्या पदार्थाची चव लोकांच्या तोंडी इतकी रुळलेली आहे की परदेशात गेलेली मंडळी आपल्या नातेवाईकांना ई-मेलवर पदार्थाची यादी पाठवतात आणि वस्तू मागवून घेतात. पदार्थ मिळाल्यावर तो चाखल्यानंतर फोनही करून सांगतात. तरीही वर्षभर इथल्या पदार्थाच्या किमती स्थिर असतात. पाल्र्यातील अनेक प्रसिद्ध कलाकार मंडळी रघुवीरचे नियमित ग्राहक आहेत.

मोतीचूर, रवा, बेसन, डिंक, मेथी, मूग, नाचणी, चूर्मा, राजगिरा, कडक बुंदी असे बारा ते चौदा प्रकारचे लाडूही येथे वर्षभर मिळतात. डिंक आणि कडक बुंदीचे लाडू गुळामध्ये तयार केलेले असतात. इथला मोतीचूर लाडू आणि चिवडा लग्नकार्यासाठी प्रसिद्ध आहे. वेलची आणि जायफळ घातलेला रघुवीरचा पार्टी पेढा तर खूपच नावाजलेला आहे. पहिलीपासून ते दहावीच्या निकालानंतर तो नेणारी मंडळी पाल्र्यात आहेत. त्याचसोबत केसर आणि पिस्ता पेढाही मिळतो.

संक्रातीला तिळाची वडी, नारळी पौर्णिमेला नारळीपाक, होळीला पुरणपोळी, तेलपोळी, गुळपोळी असते. गणपतीला आणि वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीच्या दिवशी मोदक मिळतात. जायफळ घातलेले मोदक तब्बल आठ ते दहा दिवस टिकतात. अनेक लोक गणपतीला गावाला जाताना इथले मोदक घेऊन जातात. खारी, टोस्ट, बिस्किटं, मावा केक, नानकटाई असे काही मोजके बेकरीचे पदार्थही रघुवीरमध्ये मिळतात. पण ते कुठल्याही बेकरीतून विकत न आणता त्यांना हव्या त्या पद्धतीने बेकरीतून बनवून घेतले जातात.

चंद्रशेखर यांच्या मातोश्री गंगाबाई यांचं वय आजमितीला ८६ असलं तरी त्या स्वत:हून पेढे वळायला बसतात. पत्नी नंदिनी आणि मुलांचीही मिळते. दररोज रघुवीरमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व पदार्थाची चंद्रखेशर जातीने चव घेतात आणि नंतरच पदार्थाचं पॅकिंग दुकानात केलं जातं. त्यावर पत्ता आणि ग्राहकांसाठी संपर्क क्रमांक मोठय़ा अक्षरात लिहिलेला असतो. पाल्र्यातील लोक चवीने खाणारी आहेत. त्यामुळे चांगलं बोलणं आणि चांगली वस्तू देणं हे तत्त्व आम्ही पाळत आलो आहोत, असं चंद्रशेखर हसतमुखाने सांगतात.

श्री रघुवीर स्टोअर्स

कुठे – प्रभात कॉटेज, हनुमान रोड, पाल्रे टिळक विद्यालय समोर, विलेपाल्रे (पुर्व), मुंबई -४०००५७

कधी – सोमवार ते शनिवार सकाळी ८.३० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ३.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत. रविवार बंद.