‘श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे पत्रकारितेतील योगदानाबद्दल पहिला श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या मंगळवारी डॉ. मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित खास समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मलसिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जनसंघाचे संस्थापक डॉ. मुखर्जी यांची पुण्यतिथी ‘बलिदान दिन’ म्हणून साजरी करण्यात येते. त्या निमित्ताने शिवाजी पार्क, दादर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारकातील सभागृहात २३ जून रोजी सायंकाळी ७ वाजता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व मुंबई भाजपचे पदाधिकारी अमरजित मिश्र यांनी दिली.