प्रभादेवीच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिरास आंतराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ प्रमाणपत्र (आयएसओ ९००१:२००८) जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी साध्या समारंभात मंदिराच्या व्यवस्थापनाकडे प्रमाणपत्र सुपूर्द केले. उत्तम आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाबद्दल हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. दरम्यान, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई मंदिर यापुढे चोवीस तास खुले राहील असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे जाहीर केले आहे.