सामाजिक कार्यात तरुणाईला सामावून घेण्याचा प्रयोग

आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनीयर व्हावे.. भरपूर पैसा मिळवावा असे स्वप्न बहुतेक पालक पाहात असताना याच तरुणाईला सामाजिक बांधिलकी शिकवून सामाजिक कार्याचा सेतू उभारण्याचे एक अद्भुत काम अध्र्या दशकाहून अधिक काळ डॉ. अभय बंग आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. त्यांनी ‘निर्माण’ केलेल्या कार्याकडे परदेशात जाऊ इच्छिणारे तरुणही आता मोठय़ा संख्येने वळू लागले असून समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत तळागाळातील लोकांसाठी काम करीत आहेत.

डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेच्या माध्यमातून २००६ साली सामाजिक जाणीव असलेल्या सुशिक्षित तरुणांना हेरून त्यांच्या या जाणिवांची उत्तम मशागत करण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी ‘निर्माण’ या संस्थेची निर्मिती करण्यात आली असून डॉक्टर, अभियंते, चार्टर्ड अकाऊंटंट, व्यवस्थापन क्षेत्र, तसेच कला क्षेत्रासह वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुणांना सामाजिक कार्यात हरहुन्नरी बनविण्याचे काम केले जाते.

१८ ते २५ वयोगटांतील तरुण-तरुणींना या उपक्रमात दीड वर्षांत तीन टप्प्यांत विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे सर्व प्रशिक्षण गडचिरोली येथे तसेच दुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या आदिवासींच्या घरी निवास करून घ्यावे लागते.

साधारणपणे आठ ते पंधरा दिवसांचे एक सत्र अशा तीन सत्रांत सामाजिक कार्याचे रोपटे या तरुणांमध्ये रुजविण्याचे काम केले जाते. जानेवारी, जून व डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या सत्रांमध्ये समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे मान्यवर आपले अनुभव या तरुणांपुढे उलगडतात, तसेच आरोग्यासह कोणकोणत्या क्षेत्रात कशा प्रकारे काम करता येते याची तपशीलवार माहितीही देण्यात येते. गेल्या आठ वर्षांत संस्थेतून सुमारे आठशेहून अधिक तरुणांनी ‘निर्माण’चा अभ्यासक्रम पूर्ण केला असून यापैकी ३२ जिल्ह्य़ांमधून १३० हून अधिक तरुणांनी सामाजिक कार्यात स्वत:ला पूर्णवेळ झोकून दिले आहे. बाबा आमटे यांच्यापासून डॉ. अभय बंग यांच्यापर्यंत अनेकांनी स्वत:च्या सामाजिक कार्यातून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. तथापि, सामाजिक कार्याची आवड असलेल्या अनेक तरुणांना नेमके मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे अशा प्रकारचे काम कसे सुरू करायचे, त्यातील अडथळे, अडचणी तसेच राजकारणापासून येणाऱ्या अनेक प्रश्नांचा सामना नेमका कसा करायचा याचे मार्गदर्शन ‘निर्माण’च्या प्रशिक्षणातून मिळते. डॉ. अभय बंग यांचे चिरंजीव अमृत बंग यांनी अमेरिकेतील विद्यापीठातून ‘नॉन प्रॉफिट मॅनेजमेंट’ या विषयात ‘एमएस’ केले असून त्यांनी ‘निर्माण’मधील प्रवेशाबाबत सांगितले की, २५ ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी अर्ज भरता येतील आणि १५ ऑक्टोबपर्यंत उमेदवारांची निवड केली जाईल. ज्यांना हा अभ्यासक्रम करायचा आहे

सामाजिक कार्यात हरहुन्नरी बनवण्यिाचे काम

डॉक्टर, अभियंते, चार्टर्ड अकाऊंटंट, व्यवस्थापन क्षेत्र, कला क्षेत्रासह  तरुणांना सामाजिक कार्यात हरहुन्नरी बनविण्याचे काम केले जाते. १८ ते २५ वयोगटांतील तरुण-तरुणींना या उपक्रमात दीड वर्षांत तीन टप्प्यांत विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे सर्व प्रशिक्षण गडचिरोली येथे तसेच दुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या आदिवासींच्या घरी निवास करून घ्यावे लागते. आठ ते पंधरा दिवसांचे एक सत्र अशा तीन सत्रांत सामाजिक कार्याचे रोपटे या तरुणांमध्ये रुजविले जाते.