उच्च दाब वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी दुपारी मुंबई महानगरपालिका, जीटी रुग्णालयासह दक्षिण मुंबईतील काही भागांत अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत होण्यास दोन तास लागले.
मुंबई महानगरपालिका व छत्रपती शिवाजी टर्मिनसचा परिसर, जीटी रुग्णालय, गिरगाव, बेलार्ड इस्टेट, चर्चगेट आदी भागांत दुपारी तीन वाजता वीजपुरवठा बंद पडला. अध्र्या तासात बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा सुरूळीत झाला. पण काही ठिकाणी वीजसेवा सुरळीत होण्यास पाच वाजले. वीजपुरवठा बंद पडल्याने पालिका, व्यावसायिक आस्थापने, रुग्णालयात लोकांचे हाल झाले.
‘बेस्ट’ला वीजपुरवठा करणाऱ्या ‘टाटा पॉवर’च्या वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने यंत्रणा ‘ट्रिप’ झाली आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे ‘बेस्ट’च्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. खास प्रतिनिधी, मुंबई
उच्च दाब वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी दुपारी मुंबई महानगरपालिका, जीटी रुग्णालयासह दक्षिण मुंबईतील काही भागांत अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत होण्यास दोन तास लागले.
मुंबई महानगरपालिका व छत्रपती शिवाजी टर्मिनसचा परिसर, जीटी रुग्णालय, गिरगाव, बेलार्ड इस्टेट, चर्चगेट आदी भागांत दुपारी तीन वाजता वीजपुरवठा बंद पडला. अध्र्या तासात बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा सुरूळीत झाला. पण काही ठिकाणी वीजसेवा सुरळीत होण्यास पाच वाजले. वीजपुरवठा बंद पडल्याने पालिका, व्यावसायिक आस्थापने, रुग्णालयात लोकांचे हाल झाले.
‘बेस्ट’ला वीजपुरवठा करणाऱ्या ‘टाटा पॉवर’च्या वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने यंत्रणा ‘ट्रिप’ झाली आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे ‘बेस्ट’च्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.