सहज पैसे मिळवून देण्याचा दावा करत लाखो लोकांना गंडा घालणाऱ्या ‘स्पीक एशिया’ या कंपनीच्या वितरण विभागाच्या प्रमुखाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. संजीव मेहता असे या अधिकाऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने संजीव मेहता याला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.