मुंबईतील ठाकुर्ली येथील उड्डाणपुलाचा गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वे आज (दि.२०) विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज सकाळी ९.१५ ते १२.४५ पर्यंत हा विशेष ब्लॉक असणार आहे.

या मेगा ब्लॉकदरम्यामन मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या काही फेऱ्यांप्रमाणेच मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, मनमाड-मुंबई पंचवटी, एलटीटी मनमाड-गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक आणि पुण्यावरून मुंबईत येणाऱ्या गाड्या कल्याण आधीच थांबवण्यात येणार आहेत.

सीएसएमटी ते कसारा, आसनगाव, टिटवाळा आणि कर्जत, बदलापूर, अंबरनाथ मार्गावरील अप आणि डाऊन सेवा बंद राहणार आहेत. शिवाय बाहेरच्या राज्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेसही कल्याण स्थानकातच थांबवण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉ़कमुळे डोंबिवली-कल्याण दरम्यान डाऊन आणि अप धीम्या व जलद मार्गावर लोकल सेवा बंद राहतील. तसेच सकाळी सीएसएमटी ते कसारा, आसनगाव, टिटवाळा आणि कर्जत, बदलापूर, अंबरनाथ मार्गावरील अप व डाऊन सेवा बंद राहणार आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु राहील.