भरधाव होंडा अकॉर्ड ने सात जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू

मुंबईच्या खार परिसरात एका भरधाव होंडा अकॉर्ड कारने चिरडल्यामुळे दोन जणांचा मृत्यून झाला असून

मुंबई | February 13, 2013 03:22 am

मुंबईच्या खार परिसरात एका भरधाव होंडा अकॉर्ड कारने चिरडल्यामुळे दोन जणांचा मृत्यून झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. महेश अजवानी आणि बाळकृष्ण राणे अशी दोघं मृत व्यक्तीची नावे आहे. जखमी लोकांना उपचारासाठी भाभा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार चालक मोबीन परमारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आज (बुधवार) सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले कि, कार चालकाने नो एंट्री झोनमध्ये गाडी घुसवली आणि त्याने या लोकांना चिरडण्यासोबतच काही गाड़्यांचेही नुकसान केले. कार चालकावर भरधाव गाडी चालवणे आणि बेजबाबदारपणे ड्रायविंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

First Published on February 13, 2013 3:22 am

Web Title: speeding honda kills two injures 5 in khar
टॅग: Khar,Speeding-honda