मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन

मुंबई महानगरपालिका हद्दीत जमिनीचे दर जास्त असल्याने केवळ मुंबईत मोकळ्या जमिनींसाठी मुद्रांक शुल्कवाढीला महिनाभराकरिता स्थगिती देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

‘मुद्रांक शुल्कवाढीला बिल्डरधार्जिणी स्थगिती’ ही बातमी रविवारच्या ‘लोकसत्ता’च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. जयंत पाटील व अन्य काही सदस्यांनी सरकारच्या या बिल्डरधार्जिण्या धोरणावरून टीका केली होती. वस्तू आणि सेवा कायद्यावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले, मुंबईत जमिनीच्या किमती फार जास्त आहेत. मुंबई आणि अन्य शहरांमधील दरात जवळपास ९० टक्के फरक आहे. परवडणाऱ्या घरांची योजना राबविण्याकरिता मुद्रांक शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार केवळ एक महिन्याकरिता ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.