स्थायी समितीची मागणी; प्रशासनाकडून मात्र सकारात्मक उत्तर नाही

मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतल्यानंतरही कुत्र्यांच्या संख्येला आळा बसलेला नाही. त्यामुळे रात्री-अपरात्री अंगावर धावून येणाऱ्या, पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतो आहे. कुत्र्यांचा संहार करण्यास बंदी घालण्यात आली असली, तरी रस्त्यावर भटकणारी बेवारस कुत्री नागरिकांसाठी किती धोकादायक बनली आहेत, याची माहिती पालिकेने उच्च न्यायालयाला द्यावी आणि यावर तोडगा काढावा, अशी एकमुखी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली. मात्र प्रशासनाकडून त्यावर कोणतेच सकारात्मक उत्तर देण्यात आले नाही.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
pune, fergusson college, holi, boy, throwing water, balloons, pedestrians, arrested, police,
होळीच्या दिवशी रस्त्यावर फुगे मारणारी हुल्लडबाज मुले ताब्यात; पोलिसांकडून पालकांवर गुन्हे
orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…

न्यायालयाने कुत्र्यांना मारण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे पालिकेच्या श्वान नियंत्रण विभागाने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी १९९४ पासून प्रायोगिक तत्त्वावर प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रम हाती घेतला आहे. अशासकीय संस्थांच्या मदतीने कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात येत आहे.

१९९८ पासून २०१७ पर्यंत तब्बल १० कोटी १ लाख ५ हजार ८५७ रुपये खर्च करून पालिकेने केवळ २ लाख ८० हजार ८६९ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी मूळ प्रस्तावात तिसऱ्यांदा फेरफार करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या मंगळवारच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. १ लाख २ हजार ३७९ कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी अशासकीय संस्थांना ८ कोटी ६१ लाख १२ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सुधार समितीच्या बैठकीत सादर केला होता.

मुंबईमध्ये २०१४ मध्ये श्वान गणना करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत ९४ हजार १७२ कुत्रे असल्याचे निदर्शनास आले होते. त्यापैकी २५ हजार ९३३ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले नसल्याचे आढळून आले.

सध्या मुंबईमध्ये सुमारे एक लाख भटके कुत्रे असून दरवर्षी त्यापैकी ३० टक्के म्हणजे ३० हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी व्यक्त केली.

मुंबईमध्ये रात्री-अपरात्री रस्त्यावरून जाताना भटकी कुत्री अंगावर धावून येण्याच्या घटना वाढत आहेत. कुत्र्याने चावा घेतल्यामुळे अनेक मुंबईकर जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांची मुंबईकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. निर्बीजीकरण केल्यानंतरही कुत्र्यांना पिल्ले होत आहेत. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेने ही वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केली.

शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर, नगरसेविका राजूल पटेल, नगरसेवक संजय घाडी आदींनी आपल्या प्रभागातील कुत्र्यांच्या त्रासाची माहिती यावेळी दिली.

कुत्रा पाळणाऱ्यांवर कारवाईची मागणी

अनेक मुंबईकर घरामध्ये कुत्रे पाळतात आणि सकाळच्या वेळी फिरायला जाण्याच्या निमित्ताने सोबत कुत्रे घेऊन घराबाहेर पडतात. हे पाळीव कुत्रे रस्त्यावर घाण करतात. पालिकेचे रस्ते घाण करण्यासाठी आहेत का? पाळीव कुत्र्याने रस्त्यावर घाण केल्यास त्याच्या मालकावर कारवाई करावी, तसेच कुत्रा पाळण्यासाठी परवाना द्यावा, अशी मागणी शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी यावेळी केली. काही सोसायटय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कुत्रे पाळण्यात येतात. त्याचा अन्य रहिवाशांना त्रास होतो. त्यावरही पालिकेने तोडगा काढण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाले.