महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनालयातर्फे ५६ व्या हौशी मराठी राज्य नाटय़ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला ७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१६ अशी आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यात विविध केंद्रांवर होणार आहे. स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर त्यांच्यासाठी  निश्चित केलेल्या केंद्रावर व तारखेस प्रयोग करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील प्रवेशिका आणि नियम www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या मथळ्याखाली पाहायला मिळतील.   ७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.