मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
गेले अनेक दिवस घोळ घालून अखेर राज्य सरकारने शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना ७ टक्के महागाई भत्त्यात वाढ देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याची अंमलबजावणी चालू महिन्यापासून म्हणजे १ नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे, त्यामुळे कर्मचारी संघटनांमध्ये काहीशी नाराजी आहे.
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १ जुलै २०२ पासून ७ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला. हा भत्ता जशाच्या तसा राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना द्यावा, यासाठी गेले महिनाभर आंदोलने व चर्चा सुरू होती. अर्थमंत्री जयंत पाटील यांनी या प्रश्नावर सर्व संबंधित संघटनांच्या नेत्यांशी तीन-चारवेळा चर्चा केली. मंगळवारी झालेल्या बैठकीत वाढीव महागाई भत्ता देण्यास सरकारची तयारी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज बुधवारी १ नोव्हेंबरपासून ७ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील चार महिन्यांचा भत्ता मिळणार की नाही, याबद्दल अद्याप काही स्पष्ट झाले नसले तरी दिवाळीच्या तोंडावर महागाई भत्त्यात वाढ करुन सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना गोड बातमी दिली आहे. राज्यातील सुमारे १६ लाख कर्मचारी-अधिकाऱ्यांना व चार लाख निवृत्तीवेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















