19 August 2017

News Flash

गो-सेवेसाठी पेट्रोलवर अधिभार लावा!

भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची कल्पना

खास प्रतिनिधी, मुंबई | Updated: June 19, 2017 2:03 AM

भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी. (संग्रहित)

भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची कल्पना

गायींचा देखभाल निधी उभारण्यासाठी पेट्रोलवर एक रुपयाचा अधिभार लावण्याची कल्पना भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी ‘गौरवशाली भारतीय गाय’ या परिषदेत मांडली. १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धात सैन्यखर्चासाठी स्त्रियांनी हातातल्या सोन्याच्या बांगडय़ा काढून दिल्या होत्या. गायींच्या संरक्षणासाठी तर सर्वच जण मदत करतील, असेही त्यांनी सांगितले. या वेळी गाय आणि अध्यात्म, गाय आणि आरोग्य या विषयांवरही चर्चासत्र आयोजिण्यात आली होती.

दूध व पुनरुत्पादनाची क्षमता संपलेल्या गायी सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नसते. मात्र या गायींचे मूत्र तसेच शेणापासून उत्पादनांची निर्मिती करून तसेच इतर गायींचे दुग्धोत्पादन वाढवून शेतकऱ्याला भाकड गायीही सांभाळणे कठीण जाणार नाही, असे परिषदेतील विविध सत्रात सहभागी झालेल्या वक्त्यांकडून सांगण्यात आले. मात्र, गायींना सांभाळण्यासाठी पेट्रोलवर एक रुपयाचा अधिभार लावता येईल, असे या परिषदेचे मुख्य सूत्रधार सुब्रमण्यम स्वामी यांनी समारोप भाषणात सांगितले. याला ‘गौ संरक्षण कर’ म्हणावे अशी प्रेक्षकांतून आलेली सूचनाही त्यांनी उचलून धरली.

गायींचे रक्षण करणे हे राज्यघटनेनुसार सर्वानाच बंधनकारक असल्याने हिंदू व मुस्लिमांनाही हा अधिभार द्यावा लागेल, असे ते म्हणाले. गोहत्येवर बंदी आणली तर मांसनिर्यातीचा व्यवसाय ठप्प होईल असे सांगितले जाते. त्यापेक्षा गायींची दूधउत्पादन क्षमता वाढवून ते निर्यात करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. अमेरिकेत कुत्रा, इंग्लंडमध्ये घोडा मारल्यावर रान उठते त्याचप्रमाणे भारतात गायींना संरक्षण आहे. अरुणाचल प्रदेशनेही त्याचे पालन करायलाच हवे. गायींना मारण्याच्या गुन्ह्य़ासाठी फाशी देण्याचा कायदा लवकरच केंद्रीय स्तरावर केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.मुंबई शेअर बाजारच्या इमारतीत पार पडलेल्या या परिषदेत गृह विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर सहभागी झाले होते. प्रत्येक राज्यात  गोप्रकल्प राबवण्यात येणार असून त्यांच्यासाठी चारा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे अहिर यांनी अधोरेखित केले.

गायींच्या नजरेतील करुणेमुळे..

नाशिक येथील पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे हे परिषदेतील परिसंवादात सहभागी झाले होते. गायींची बेकायदेशीर वाहतूक करणारी शंभरहून अधिक प्रकरणे उघडकीस आणून त्यांनी १२३ देशी गायी व २२ बैलांना वाचवल्याचे सांगण्यात आले. गायींना सोडवल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असत. गायींच्या नजरेतील करुणेमुळेच त्यांना वाचवण्याचे बळ मला मिळाले, असे घाडगे म्हणाले.

सुब्रमण्यम म्हणाले

 • ’गायींचे रक्षण करणे हे राज्यघटनेनुसार सर्वानाच बंधनकारक आहे.
 • ’अमेरिकेत कुत्रा, इंग्लंडमध्ये घोडा मारल्यावर रान उठते त्याचप्रमाणे भारतात गायींना संरक्षण आहे.
 • ’गायींना मारण्याच्या गुन्ह्य़ासाठी फाशी देण्याचा कायदा लवकरच केंद्रीय स्तरावर केला जाणार आहे.

First Published on June 19, 2017 2:02 am

Web Title: subramanian swamy on petrol tax
 1. उमेश मोंडकर
  Jun 19, 2017 at 1:30 pm
  ज्यांना गोप्रेमाचा एवढा उमाळा असेल त्यांनी स्वखर्चाने भाकड जनावरांना जरूर सांभाळावे.उठसूठ लोकांच्या खिशात हात कशाला घालता?नाशिकच्या ज्या पोलीस उपायुक्तांचा सत्कार करण्यात आला त्यांनी नोकरी सोडून गायवासरे सांभाळत बसावे.कारण अशीही नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेचे गेल्या काही काळात जे धिंडवडे निघाले आहेत त्याला जबाबदार हे असेच अधिकारी आहेत.
  Reply
 2. सुहास
  Jun 19, 2017 at 10:08 am
  सुब्रमण्यम स्वामींपासून सगळ्या गुंडाड गोभक्तांनी कधीही स्वतः गाय पाळलेली नसते किंवा दोहलेली नसते. उगाच गोसेवेचा भार सामान्य करदात्यांवर टाकण्याचा पराक्रम परावलंबी बांडगुळाने करू नये. आधीच स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत सेवाकरावर अर्धा टक्का अधिभार लावून जनतेची लूट सुरु आहे. त्या अधिभाराचे काय केले हे पहिल्यांदा सांगा.
  Reply
 3. S
  Sandeep
  Jun 19, 2017 at 9:09 am
  Ya swamila roj nashtyala Shen (dung)Kayla dya
  Reply
 4. S
  Shrikant Shevalkar
  Jun 19, 2017 at 7:40 am
  Let Mr Swami donate his all ry including benefits till he is MP and let him publush in public ,on every thing he wants to sufffer public .
  Reply