रेल्वेमार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तपशील खालीलप्रमाणे..
मध्य रेल्वे
कुठे – ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर
कधी – सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वा.
परिणाम – डाउन मार्गावर चालणाऱ्या सर्व धीम्या व अर्धजलद गाडय़ा ब्लॉकदरम्यान मुलुंड ते कल्याण या दरम्यान डाउन जलद मार्गावर धावतील. या गाडय़ा ठाणे ते कल्याण या दरम्यान फक्त डोंबिवली स्थानकात थांबतील. ब्लॉकदरम्यान अप जलद मार्गावरून धावणाऱ्या गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील. ब्लॉकदरम्यान वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू असेल. तसेच काही फेऱ्या रद्द केल्या जातील.
हार्बर मार्ग
कुठे – कुर्ला ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर
कधी – सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वा.
परिणाम – हार्बर मार्गावरील वाहतूक कुर्ला ते मानखुर्द या स्थानकांदरम्यान बंद राहील. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि मानखुर्द ते पनवेल या मार्गावर विशेष गाडय़ा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गावरून त्याच तिकिटाने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच ब्लॉकच्या काळात बेस्टच्या ५०१ मर्या. या मार्गावरील बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे – अंधेरी ते माहीम स्थानकांदरम्यान अप व डाउन जलद मार्गावर
कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील सर्व गाडय़ा अंधेरी ते माहीम या स्थानकांदरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावरून जातील.  गाडय़ांची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने राहील.