मध्य रेल्वे
’कुठे – कल्याण-ठाणे यांदरम्यान अप धिम्या मार्गावर
’कधी – सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वा.
’परिणाम – ब्लॉकदरम्यान कल्याण आणि ठाणे या दोन स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाडय़ा अप जलद मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांवरील प्रवाशांना डोंबिवली किंवा ठाणे स्थानकातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
तसेच डाऊन व अप मार्गावर धावणाऱ्या सर्व जलद गाडय़ा त्यांच्या नियोजित थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील. तर सर्वच सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.

पश्चिम रेल्वे
’कुठे – भाईंदर ते वसई रोड यांदरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर
’कधी – मध्यरात्री ००.३० ते पहाटे ४.३० वा.
’परिणाम – ब्लॉकदरम्यान भाईंदर ते वसई यांदरम्यानच्या सर्व धिम्या गाडय़ा जलद मार्गावरून चालवल्या जातील. यामुळे काही गाडय़ा रद्द असतील. रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल.

हार्बर मार्ग
’कुठे – वाशी-बेलापूर दरम्यान अप आणि डाउन मार्गावर
’कधी – पहाटे २.०० ते सकाळी १०.०० वा.
’परिणाम – ब्लॉकदरम्यान या स्थानकांदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद असेल. मात्र मुंबई-वाशी-मुंबई आणि पनवेल-बेलापूर-पनवेल यांदरम्यान विशेष सेवा चालवल्या
जातील.
ब्लॉकनंतर मुंबईहून पनवेलसाठी पहिली गाडी सकाळी ८.२३ वाजता सुटेल. पनवेलहून मुंबईसाठी पहिली गाडी सकाळी ९.१० वाजता निघेल.
ठाण्याहून पनवेलसाठी पहिली गाडी ११.१२ वाजता निघेल आणि पनवेलहून ठाण्यासाठी पहिली गाडी ९.०२ वाजता सुटेल.

 

 

‘मरे’वर दुसरी ‘दोन आसनी’ लोकल दाखल
प्रतिनिधी, मुंबई<br />धावत्या लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी आणि वाढत्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चालवलेल्या दोन आसनी लोकलचे प्रवशांकडून स्वागत करण्यात आल्याने शुक्रवारी मध्य रेल्वेने दुसरी लोकल चालवली. या गाडीच्या डबा क्रमांक ४, ६,९ आणि १० या डब्यात दोन आसनी व्यवस्था करण्यात आली. या दोन आसनी व्यवस्थेमुळे डब्यातील प्रवासी क्षमता ५९३ ऐवजी ६५१ इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि चौथ्या डब्यात मेट्रोप्रमाणे आसनव्यवस्था बसवण्यात आली असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.