ट्रस्टने ही जागा भाडेतत्त्वावर घेतलेली आहे. ट्रस्टचा या जागेवर कुठलाही मालकी हक्क नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि ‘ट्रस्ट’चे काम पाहणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

भूषण सामंत यांनी केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत मुंबईतील खोतांच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तसेच चौकशीनंतर आवश्यक तो निर्णय घेण्याचे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका निकाली काढली होती. याचिकाकर्त्यांकडून चांदिवली येथील जमिनीवर सुप्रिया सुळे यांच्या ‘पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ची ‘पवार पब्लिक स्कूल’ ही शाळा उभी राहिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र ही जागा ट्रस्टने भाडेतत्त्वावर घेतली असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
Redevelopment of Abhyudaya Nagar Colony through open tender
मुंबई : खुल्या निविदेद्वारे अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास