प्रसिद्ध चित्रपट आणि विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते सुरेश चटवाल यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. चौतवाल यांनी १९६९ पासून अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. दूरचित्रवाणीवरील मालिकांसोबतच त्यांनी ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.