उबेर, ओला या सारख्या खासगी टॅक्सीसेवेविरोधात आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्त्वाखालील स्वाभिमान संघटनेच्या टॅक्सीचालकांनी मंगळवारी संप पुकारला असून, या संघटनेचे टॅक्सीचालक परिवहन कार्यालयावर मोर्चाही काढणार आहेत.
उबेर, ओला या खासगी टॅक्सी सेवा पुरविणाऱयांनी आपल्या दरात कपात केल्यामुळे इतर टॅक्सीचालक संतप्त झाले आहेत. त्याविरोधात या संघटनेने संप पुकारला आहे. दरम्यान, मुंबईतील इतर टॅक्सी संघटना या संपात सहभागी झाल्या नसून त्यांचे काम सुरळीतपणे सुरू आहे. स्वाभिमान संघटनेच्या टॅक्सीचालकांनी मुंबईच्या काही भागात इतर टॅक्सीचालकांनाही संपात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती मिळते आहे. काही ठिकाणी जबरदस्तीने प्रवाशांना टॅक्सीतून खाली उतरविण्यात आले. तर काही ठिकाणी खासगी टॅक्सीचालकांवरही जबरदस्ती करण्यात आली आणि त्यांची सेवाही थांबविण्यात आल्याची माहिती मिळते आहे.