रिलायन्सच्या ग्राहकांचे वीज दर स्वस्त; वीज मंडळाकडून दर जाहीर

रिलायन्स व टाटा पॉवरचे वीज दर वीज नियामक आयोगाने शुक्रवारी जाहीर केले असून टाटा पॉवरच्या ग्राहकांना या दर बदलाचा रिलायन्सच्या तुलनेत फटका बसला आहे.

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Gang demanding extortion from municipal contractor arrested
महापालिकेच्या कंत्राटदाराकडून खंडणी उकळणारी टोळी अटकेत
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी

या वीज दरांमुळे चालू आर्थिक वर्षांत टाटा पॉवरच्या मुंबई शहरातील मूळ ग्राहकांसाठी वीज १.२ रुपयांनी महागणार आहे. तर, अन्य कंपन्यांकडून टाटाकडे आलेल्या ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा मिळणार असून त्यांची वीज ०.५५ पैशांनी कमी होणार आहे. उलट रिलायन्सची वीज त्यांच्या ग्राहकांसाठी १.५१ पैशांनी स्वस्त झाल्याने रिलायन्सच्या ग्राहकांचे वीज बील पूर्वीपेक्षा कमी होणार आहे. १ ऑक्टोबर २०१६ पासून हे नवे दर लागू होणार होतील.

वीज नियामक मंडळाने रिलायन्स व टाटा पॉवरचे बहुवार्षिक वीज दर जाहीर केल्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या दरात फरक झाला आहे. रिलायन्सने आयोगाकडे ६ टक्क्यांची दर वाढ मागितलेली असताना आयोगाने रिलायन्सचे घरगुती वीजेचे दर दीड ते दोन टक्क्यांनी कमी केले. तर, टाटा पॉवरने १७ टक्क्यांची कपात मागितली असताना आयोगाने अडीच टक्क्यांची दरवाढ करून दोन्ही कंपन्यांच्या दरातील फरक कमी करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई शहरात टाटा पॉवरचे स्वतचे व अन्य कंपन्यांकडून टाटा पॉवरकडे आलेले असे दोन प्रकारचे ग्राहक आहेत. या दर वाढी नंतर टाटा पॉवरच्या मुंबई शहरातील मूळ ग्राहकांना पुढील महिन्यापासून ज्यादा बिलाचा सामाना करावा लागणार असल्याचे दिसते. तर, अन्य कंपन्यांकडून टाटा पॉवरकडे आलेल्यांना अत्यल्प दिलासा मिळेल. उलटपक्षी रिलायन्सच्या ग्राहकांचे बील कमी होणार असल्याने त्यांचा चांगलाच फायदा होईल.

मुंबईकरांना वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर व रिलायन्स या कंपन्यांनी २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या चार वर्षांच्या वीज दरवाढीसाठी वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यावर शुक्रवारी नियामक आयोगाकडे सुनावणी होऊन बहुवार्षिक वीजदर जाहीर करण्यात आले.

त्यानुसार रिलायन्सच्या घरगुती ग्राहकांच्या वीजदरात २०१६-१७ सालासाठी १.९३ टक्क्यांनी कपात करण्यात आली. तर पुढील तीन वर्षांत अनुक्रमे ०.७६, १.०६, १५.१३ हे दर टक्क्यांनी कमी होणार आहेत.

कायम दरांमध्येही वाढ

टाटाच्या दरात १६-१७ साठी १.८५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तसेच पुढील तीन वर्षांत २.२६, २.५१, १४.९३ हे दर टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे रिलायन्सच्या ग्राहकांना पुढील चार वर्षांत दिलासा मिळणार असून टाटाच्या ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. त्याचबरोबर कायम दरांमध्ये (फिक्स चार्जेस) ५-१० रुपयांचीही  वाढ केली आहे.