सानपाडय़ावरून ठाण्याला जाणाऱ्या लोकल गाडीत एका तरुणाला मारहाण करणाऱ्या दोन तिकीट तपासनीसांना मध्य रेल्वेने निलंबित केले आहे.
 या तरुणाने तिकीट दाखवण्यात असमर्थता व्यक्त केल्यावर तिकीट तपासनीसांनी त्याला मारहाण केली.  प्रवाशांपैकी एकाने या मारहाणीचे चित्रीकरण केल्याने हा प्रकार समाजमाध्यमांच्या संकेतस्थळावर पसरला. त्यानंतर रेल्वेने ही कारवाई केली. आर. एल. यादव आणि विनोद यादव हे दोन  तपासनीस खेळाडूंच्या राखीव जागांमधून रेल्वेत रुजू झाले आहेत. प्रवासादरम्यान एका तरुणाला त्यांनी तिकीट किंवा पास दाखवण्यास सांगितले. मात्र त्याने पास दाखवण्यात असमर्थता दाखवल्यानेतपासनीसांनी या तरुणाला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.