‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यावक संघ महामंडळा’मार्फत विविध शैक्षणिक प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यासाठी २ ते ४ नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील ‘दादासाहेब गायकवाड सभागृहा’त हे अधिवेशन होईल. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिक्षक आमदार रामनाथ मोते, कपिल पाटील, दत्तात्रय सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्याध्यापकांचे उद्बोधन वर्ग देखील घेतले जाणार आहेत. तसेच विविध शैक्षणिक विषयांवर शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात असलेल्या महत्त्वपूर्ण समस्या व त्याचे निरासन करण्याचे मार्ग देखील नवनिर्वाचित सरकारकडे ठराव स्वरूपात सादर केले जाणार आहेत.