आपल्या काकाच्या दुकानात काम करणाऱ्या २२ वर्षीय मुलीवर एका तरुणाने बलात्कार केला. बोरीवली पोलिसांनी या २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पीडित मुलगी बोरीवलीच्या देवीदासपाडा येथील दुकानात काम करते. दुकान मालकाचा २० वर्षीय पुतण्या या दुकानात अधूनमधून येत असे. शुक्रवारी दुकानात कुणी नसताना आरोपीने या मुलीला पोटमाळ्यावर कामानिमित्त बोलावले आणि एकांताचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली.