खळबळजनक गौप्यस्फोटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘तहलका’ या मासिकाने यावेळी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. तहलकाच्या नव्या अंकाच्या मुखपृष्ठावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख दहशतवादी म्हणून केल्याने मोठी वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ‘सर्वात मोठा दहशतवादी कोण?’ या शिर्षकाखाली या मासिकात एक लेख छापण्यात आला असून यासाठी तयार करण्यात आलेल्या छायाचित्रात दहशतवादी याकूब मेमन, दाऊद इब्राहिम आणि भिंद्रनवाले यांच्या रांगेत बाळासाहेब ठाकरे यांचेही छायाचित्र छापण्यात आले आहे. या मुखपृष्ठामुळे एकच खळबळ उडाली आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला देण्यात आलेल्या फाशीबद्दल प्रश्नचिन्ह या लेखात उपस्थित करण्यात आले आहेत. आरोपींना शिक्षा देण्यात पक्षपात केला जात असल्याचा आरोप यातून करण्यात आला आहे. याकूब मेमनला फाशी देण्यात आली पण त्याउलट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील आरोप असूनही मृत्यूनंतर त्यांचे शायकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले, अशा मुद्द्यांवरून तहलकाच्या लेखात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
दरम्यान, तहलकाच्या या मुखपृष्ठावर मनसेचे नेते बाळा नांदगावर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या अशाप्रकारच्या मासिकांमधून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जावी, अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…