गेले तीन दिवस मुंबईकरांना घामाघूम करणारे तापमान गुरुवारीही खाली उतरण्याची चिन्हे नाहीत. बुधवारी ३७.९ अंश सेल्सिअस गाठलेला तापमापकातील पारा गुरुवारीही खाली येणार नसल्याचा अंदाज वेधशाळेने नोंदवला असल्याने सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा मतदान केंद्रांबाहेरील रांगा वाढलेल्या दिसतील.
समुद्रातील वारे दुपारी उशिरा वाहायला लागत असल्याने सोमवारपासून मुंबईची हवा तापली आहे. सोमवारी ३९ अंश से, मंगळवारी ३७.३ अंश से. असलेले तापमान बुधवारीही त्याच पातळीवर राहिले. रात्रीचे तापमानही कमी होत नसल्याने खरा उन्हाळा सुरू झाल्याचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. गुरुवारी मतदानाच्या दिवशीही हे तापमान तापदायक ठरण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ अंश से. राहील, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त
केला आहे.