दुष्काळ आणि अवकाळी पावसाने राज्याच्या तिजोरीवरील ताण वाढला आहे. सुमारे साडेतीन हजार कोटींच्या मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये बहुतांशी रक्कम मदतीवरच खर्च होणार आहे.  अर्थसंकल्पाच्या तोंडावर साडेतीन हजार कोटींच्या पुरवणी मागण्या वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात सादर केल्या. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दोन हजार कोटी आकस्मिकता निधीतून देण्यात आले होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठीची तरतूद अपुरी असल्याने त्यात वाढ केल्याचे ते म्हणाले.