श्वानांमध्ये मूत्रपिंडाचे विकार वाढले; २५२ प्राण्यांना नियमित डायलिसिस
मुंबईसह अन्य भागांत गेल्या काही वर्षांत पाळीव प्राण्यांमध्ये व विशेषत: पाळीव कुत्र्यांमध्ये बदलती जीवनशैली, आहार, औषधे आदींमुळे मूत्रपिंडाचे विकार वाढू लागले आहेत. पाळीव कुत्र्यांसाठी मुंबईत दोन डायलिसिस केंद्रे असून गेल्या पाच वर्षांमध्ये या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या कुत्र्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. सध्या ६५० हून अधिक कुत्रे येथे उपचार घेत असून त्यापैकी २५२ पाळीव कुत्र्यांना नियमित डायलिसिस करावे लागते.
एकीकडे माणसांच्या वाढलेल्या मूत्रपिंड विकारांमुळे मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मूत्रपिंड चोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. दुसरीकडे जीवनशैलीशी निगडित असलेल्या या विकारामुळे पाळीव प्राण्यांवरही नियमित डायलिसिस करण्याची वेळ येत आहे. पाळीव कुत्र्यांमध्ये हे प्रमाण अधिक असून मुंबईतील प्राण्यांच्या रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड विकारांमुळे आजारी झालेले कुत्रे भरती होऊ लागले आहेत. गोव्यातही अशाच घटना घडत असल्याचे आढळले असून येथील २ वर्षीय ब्राऊनी या बॉक्सर जातीच्या कुत्र्याला मूत्रपिंडाच्या विकारामुळे पशू वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मूत्रपिंडातील ‘क्रिएटीनाईन’ या रसायनाने २२ ही धोकादायक पातळी गाठली होती. त्याचे मालक शोरेन मिश्रा यांना आता दर दोन आठवडय़ांनंतर डायलिसिस करण्यासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. मात्र या बाबतीत मुंबईतील ९ वर्षीय रॉबी हा लॅब्रेडॉर कुत्रा कमनशिबी ठरला. त्याला फेब्रुवारीमध्ये मुंबईच्या पशू वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र चार महिन्यांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. रॉबीला डिसेंबरपासून मूत्रपिंडाचा विकार होता. त्याच्या मूत्रपिंडातील ‘क्रिएटीनाईन’ रसायनाची पातळी तीनवर पोहोचली होती. त्याला अनेक वेळा जेवणाचा त्रासही होत असे. तसेच मृत्यूपूर्वी त्याचे ४७ वेळा डायलिसिस करण्यात आले होते, असे वांद्रे येथे राहणारे त्याचे मालक मनीष दत्ता यांनी सांगितले.
पशुवैद्यांच्या मते पाळीव कुत्र्यांमध्ये मूत्रपिंडाचे विकार वाढण्यामागे
जादा प्रथिनयुक्त आहार आणि एकाच जागी बसून राहणे, आळसपणा
आदी कारणे आहेत. यामुळे कर्करोगापेक्षाही या प्रकारची जीवनशैली पाळीव कुत्र्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरते आहे.
दरवर्षी कुत्र्यांमध्ये २० टक्के मूत्रपिंडासंबंधीच्या आजारात वाढ होत असून २०१४-१५ या वर्षांत १८० कुत्र्यांना मूत्रपिंड निकामी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, २०१५-१६ या वर्षांत ती संख्या २२० इतकी झाली. बाई साखराबाई पशू वैद्यकीय रुग्णालयातही २५ टक्के पाळीव कुत्रे हे मूत्रपिंडाच्या विकारांमुळेच दाखल होतात, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जे. सी. खन्ना यांनी सांगितले.

अति-प्रथिनयुक्त आहार आणि व्यायामाचा अभाव याचा परिणाम कुत्र्यांच्या मूत्रपिंडावर होत आहे. पाळीव कुत्रा हा स्वत:हून व्यायाम करू शकत नाही. मालकाने त्याला बाहेर नेल्यास त्याचा व्यायाम होतो. मात्र मालक कामे पुढे करून हल्ली कुत्र्यांना बाहेर फिरायला नेण्याच्या बाबतीत कंटाळा करताना दिसतात. त्यामुळे सर्वप्रथम मालकांनी कुत्र्यास दररोज बाहेर फिरण्यास न्यावे. कुत्र्याला बाहेर फिरायला नेल्यास मालकांचाही व्यायाम होतो हे त्यांनी लक्षात घ्यावे. तसेच अति-प्रथिनयुक्त आहार पाळीव कुत्र्यांना देणे टाळले पाहिजे. कारण या आहारासोबत व्यायामही तितकाच आवश्यक ठरतो. त्यामुळे जास्त आहार दिल्याने वजन वाढल्याचे दिसू लागताच त्यांचा आहार नियंत्रणात आणावा.
– किशोर बाटवे, पशू वैद्य.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम