25 May 2016

हा तर कायद्याचा विजय!

संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला अखेर फाशी दिल्यामुळे देशातील विविध घटकांकडून आनंद व्यक्त केला

प्रतिनिधी, मुंबई | February 10, 2013 2:50 AM

अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला अखेर फाशी दिल्यामुळे देशातील विविध घटकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीह ट्विटरवरू प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणातात, देशाच्या कायद्याला सलाम करायला हवा. प्रत्येकाने कायद्याचे पालन करायला हवे आणि त्याविषयी आदर बाळगायला हवा, अशा शब्दांत त्यांनी ट्विट केले आहे.
भारत सरकारने जे काही केले ते कायद्याच्या परिघात राहून केले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. अफझल गुरु प्रकरणातील निकाल हा कायद्याचा विजय आहे, असे त्यांनी नमूद केले.

First Published on February 10, 2013 2:50 am

Web Title: this is victory of act says amitabh bachchan