अकोला ते औरंगाबाद दरम्यानच्या ४०० केव्ही क्षमतेच्या उच्चदाब पारेषण वाहिनीच्या क्षमतावाढीच्या कामामुळे एक हजार मेगावॉटचा वीजपुरवठा खंडित होणार आहे. परिणामी शुक्रवार २५ एप्रिलपासून रविवार २७ एप्रिल असे तीन दिवस मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यात भारनियमन होण्याची शक्यता आहे.
या तांत्रिक कामानंतर या उच्चदाब वाहिनीची वीज वाहून नेण्याची क्षमता दोन हजार मेगावॉट इतकी होणार आहे. तांत्रिक कामामुळे शुक्रवारी दुपारी चारपासून रविवारी सायंकाळी सहापर्यंत वीजपुरवठा बाधित होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, बारामती, सोलापूर, नवी मुंबई आणि ठाणे या भागात अपुऱ्या विजेच्या उपलब्धतेमुळे भारनियमन होईल, असे ‘महावितरण’ने कळवले आहे.

 

three day load shedding in state from today