उबर प्रकरणानंतर राज्यातील फ्लिट टॅक्सींमध्ये सुरक्षा विषयक सुधारणा करण्यात याव्यात, या परिवहन विभागाच्या आदेशांची अमलबजावणी करण्यासाठी विभागाने या टॅक्सी पुरवठादारांना मुदतवाढ दिली आहे.

फ्लिट टॅक्सी पुरवठादार आणि ऑनलाइन टॅक्सी पुरवठादार यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी परिवहन विभागाने या टॅक्सींमध्ये सुरक्षा विषयक सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. हा सुरक्षा विषयक आराखडा १५ जानेवारीपर्यंत सादर करायचे ठरले होते. त्याप्रमाणे सर्व खासगी टॅक्सी पुरवठादारांनी हा आराखडा सादर केला आहे. त्यानंतर शुक्रवारी सर्वप्रथम ऑनलाइन टॅक्सी पुरवठादारांसह आणि त्यानंतर फ्लिट टॅक्सी कंपन्यांच्या प्रतिनिधींसह परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी बैठक घेतली.