मासेमारी नौकांच्या समुद्रातील येण्या- जाण्याची नोंद ठेवण्यासाठी टोकन पद्धत तसेच कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती पशु संवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरूवारी विधानपरिषदेत दिली.
मुंबईला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन सागरी सुरक्षा मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. त्या पाश्र्वभूमीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सागरी सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. सागरी हद्दीमध्ये तटरक्षक दल, नौदल, कस्टम व सागरी पोलीस यंत्रणेमार्फत मासेमारी नौकांची तपासणी करण्यात येते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी मच्छिमार नौकांचा वापर झाल्यामुळे मासेमारी नौकांची ये-जा व त्यावरील खलाशांची माहिती ठेवणे महत्वाचे असल्याचे सांगून खडसे म्हणाले की,
नौदलाने सर्वेक्षण केलेल्या ५२५ ठिकाणांपेकी पकी ९१ ठिकाणे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या सर्व ९१ ठिखाणी सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसाय विभागामार्फत मासेमारी नौकांची नोंद ठेवण्यासाठी टोकन पद्धत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती खडसे यांनी एका निवेदनाद्वारे सभागृहास दिली.