मध्य रेल्वे
कुठे : ठाणे ते कल्याण यांदरम्यान डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० वा.
परिणाम : ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण यांदरम्यान डाऊन जलद गाडय़ा डाऊन धिम्या मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा ठाणे ते कल्याण या स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच ठाण्याआधी या गाडय़ा कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवरही जलद गाडय़ा थांबतील. तसेच ब्लॉकदरम्यान अप जलद मार्गावरील गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील. तसेच या काळात मेल-एक्स्प्रेस गाडय़ाही ठाणे ते कल्याण यांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून धावतील.

हार्बर मार्ग
कुठे : मशीद ते चुनाभट्टी आणि वडाळा रोड ते माहीम या स्थानकांदरम्यान.
कधी : सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वा.
परिणाम : ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल, वाशी, बेलापूर, वांद्रे आणि अंधेरी यांदरम्यान सर्व गाडय़ा रद्द असतील. मात्र पनवेल, वाशी, बेलापूर ते कुर्ला यांदरम्यान विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे
कुठे : माहीम ते अंधेरी यांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.०० ते दुपारी ४
परिणाम : ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील अंधेरीपर्यंतची वाहतूक बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे अंधेरी-चर्चगेट यांदरम्यानही काही सेवा रद्द असतील.