रस्ता सुरक्षा पंधरवडय़ाच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम राबविली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७७ हजार ९८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या ७८७, सिग्नल तोडणाऱ्या ८ हजार ५२६, ‘नो पार्किंग’ मध्ये वाहने उभी केलेल्या १६ हजार ६९२, काळ्या काचा वापरणाऱ्या २ हजार २९९, सुरक्षा पट्टा न लावणाऱ्या २ हजार ६५० वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.ठिकठिकाणी वाहन चालकांसाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.