मानखूर्दमध्ये वीजेच्या धक्क्याने दोन गणेश भक्त जखमी झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेत मोहम्मद नामक तरुण गंभीर जखमी झाला असून या घटनेत तो ६० ते ६५ टक्के भाजला आहे.
मानखूर्दमध्ये एका मंडळाची वाजतगाजत मुर्ती आणली जात होती. यादरम्यान गणेश मुर्तीचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाला. वीजेचा प्रवाह मुर्तीत उतरला आणि मुर्तीजवळील दोन तरुण यात भाजले. या अपघातातील दुस-या जखमी तरुणाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तर मोहम्मद या तरुणावर सध्या शीव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उल्हासनगरपाठोपाठ मानखूर्दमध्येही अशीच घटना घडली आहे. उल्हासनगरमधील सेक्शन १७ मध्ये जय मातादी मित्र मंडळाचे कार्यकर्ते गणेश मुर्ती घेऊन निघाले हेाते. टर्निंग पॉईंट चौकात मुर्तीचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला आणि यात दोन युवा गणेशभक्तांचा मृत्यू झाला.