एकाने विष पिऊन जीवन संपवले तर दुसऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

आरे वसाहतीतील फिल्टर पाडा येथील आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या या विद्यार्थ्यांने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यातून तो वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याच विद्यार्थ्यांच्या मित्रानेही विष पिऊन आत्महत्या केली. मयत झालेल्या या विद्यार्थ्यांवरही लैंगिक अत्याचार झाला होता का? याचा पोलीस तपास करत आहेत.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या युवकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाला आणि त्यानंतर जिवे ठार मारण्याची धमकी दिली गेली, असे आईला सांगितले. आईने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी अनसíगक लंगिक अत्याचार, ‘पॉस्को’अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ जुलच्या मध्यरात्री आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला उलटय़ा सुरू झाल्या. वडिलांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. विषारी द्रव्य प्यायल्यामुळे मुलाला हा त्रास होत असल्याचे समोर आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने या मुलाला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. १२ जुलला त्याने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. ६ जुलैरोजी खासगी शिकवणीला जाण्याआधी माझ्यावर आणि बरोबरच्या मित्रावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. हा प्रकार सांगितला तर ठार मारण्याची धमकीही देण्यात आली, असे या मुलाने सांगितले.

विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाला का? हे जाणून घेण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातून या मुलावर लंगिक अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले असल्याची माहिती ‘लोकसत्ता’ला मिळाली आहे.

दरम्यान, डॉक्टरांचा अहवाल अद्याप हाती आलेला नाही. या मुलाने त्याच्या आईला आरोपीचे नाव सांगितले आहे. त्या आधारे परिसरात तपास सुरू केला, मात्र आरोपी हाती लागलेला नाही. आरोपी एकच होता की त्याचे अन्य कोणी साथीदार होते, दोन्ही मुलांवर लैंगिक अत्याचार झाला का याची माहिती चौकशीनंतरच मिळणार असल्याचे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.

या घटनेत दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाला. त्या मुलाच्या पालकांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यालाही उलटय़ा झाल्या होत्या, मात्र त्या अपचनापणामुळे झाल्या असाव्यात, असे पालकांनी सांगितले. त्या मुलाच्या मृतदेहाची शवचिकित्सा न करताच अंत्यविधी झाला आहे. त्यामुळे त्याने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली होती, हे स्पष्ट करणे पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे.