‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो-३ प्रकल्प उभारणीसाठी हाँगकाँगच्या ‘आयकॉम एशिया’ कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी याबाबत करार करण्यात आला.
‘आयकॉम एशिया’च्या नेतृत्वाखाली जपानमधील पाडेको, अमेरिकेतील एलजीबी आणि फ्रान्समधील ईजीस रेल या संस्था सल्लागार मंडळ म्हणून काम करणार आहेत. निविदांचे मूल्यमापन, कंत्राटदार नेमणूक, आराखडे तपासणे व आढावा, साहित्य खरेदीच्या निविदा व कागदपत्रांचा आराखडा बनविणे, उपकरणांच्या वितरणासह ते स्थापित करण्याच्या कामाचा आढावा, कामाची गुणवत्ता व सुरक्षितता, पर्यावरण आदी बाबींची संपूर्ण जबाबदारी सल्लागारावर राहील.