२६ /११च्या दहशतवादी हल्ल्याचे मूळच मुंबईच्या सागरी किनाऱ्यापाशी होते. या हल्ल्यानंतर सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आणि ठिकठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या. मुंबईत वरळी सागरी सेतूच्या ठिकाणीही नोव्हेंबर, २०११ मध्ये अक्षरश: झोपडीवजा पोलीस चौकी उभारण्यात आली होती. त्याचे छायाचित्र ‘इंडियन एक्स्प्रेस’चे छायाचित्रकार वसंत प्रभू यांनी पहिल्यांदा टिपले आणि प्रसिद्ध केले. तेव्हापासून गेले तीन वर्ष या मोडक्यातोडक्या झोपडीत बसून पोलीस सागर किनाऱ्यावर गस्त घालत आहेत. पिण्याच्या पाण्याची धड सोय नाही, संध्याकाळ झाली की मच्छरांनी वेढलेल्या त्या झोपडीचाही धड सहारा पोलिसांना घेता येत नव्हता. पोलिसांची ही व्यथा पुन्हा एकदा प्रभू यांनी २०१५ च्या नोव्हेंबरमध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये छापलेल्या आपल्या छायाचित्रातून पुढे आणली. त्याची ताबडतोब दखल घेत विद्यमान पोलीस आयुक्त अहमद जावेद आणि पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी दोन महिन्यांत वरळी सी लिंक येथे अद्ययावत पोलीस चौकी पोलिसांना बांधून दिली आहे.

नोव्हेंबर, २०११

Untitled-8

नोव्हेंबर, २०१५

Untitled-10

जानेवारी, २०१६

Untitled-9