• पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी ३१ जुल ही अखेरची मुदत आहे. ही मुदत आणखी पंधरा दिवसांनी वाढवून द्यावी यासाठी दोन वेळा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याशी चर्चा झाली आहे. तसा विनंती प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असून लवकरच याबाबतचा निर्णय केंद्र सरकारकडून येईल, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
  • गेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विम्याच्या चार हजार २०० कोटी रुपयांपकी तीन हजार ६५६ कोटी रुपये जमा केल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. गेल्या हंगामात दहा लाख शेतकऱ्यांना  पीक विम्याची रक्कम मिळाली नसून त्यातील साडेसात लाख शेतकरी मराठवाडय़ातील असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

 

शेततळे की सत्यनारायणाचा प्रसाद- जयंत पाटील</strong>

सरकार आपल्याच योजनेबाबत गंभीर नाही. मागेल त्याला शेततळे देण्याची योजना जाहीर करता परंतु त्यासाठी पुरेसा निधी दिला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत असून यामुळे तुम्ही शेततळी देता की सत्यनारायणचा प्रसाद देता असा प्रश्न निर्माण झाल्याची टीका राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.

एकीकडे शेतकऱ्यांच्या अतामहत्या सुरु आहेत. अशावेळी शेततळ्याचा आसरा शेतकऱ्याला मिळण्यासाठी त्याला दिला जाणार एक लाख रुपयांचा निधी अपुरा असून अधिकचे पैसे दिले पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. मात्र रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत ठोस उत्तर न दिल्यामुळे ‘कथलाच्या वाळ्याला सोन्याचा मुलामा’ देण्याचे काम सरकार करत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्याला खरा लाभ मिळत नसून ‘मागेल त्याला शेततळे’ योजना नेमकी स्पष्ट होत नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.