विनोद तावडे यांची अद्याप मंजुरी नाही; खरेदी प्रक्रिया रद्द करण्याची सचिवांची शिफारस

तंत्रशिक्षण संचालकांकडून महाविद्यालयांसाठी सुमारे साडेचार हजार संगणकांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली असली तरी अद्याप खरेदी प्रक्रिया अपूर्ण असून तावडे यांनी त्यास मंजुरी दिलेली नाही. माहिती व तंत्रज्ञान महामंडळाकडून करण्यात येत असलेल्या खरेदीतील दरांपेक्षा जादा दर देण्यात आल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करून महामंडळाकडूनच संगणक घ्यावेत, अशी शिफारस अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तावडे यांच्याकडे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तावडे यांनी महागडय़ा संगणक खरेदीस मान्यता दिलेली नसून यासंदर्भात काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला व ‘नो कमेंट्स’ एवढेच सांगितले.

pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

तंत्रशिक्षण संचालकांकडून राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत आय ३ व आय ५ या संगणकांसाठी माहिती व तंत्रज्ञान महामंडळाला देण्यात आलेल्या दरांपेक्षा १२-१४ हजार रुपये अधिक दर देण्यात आला आहे. कंपन्यांनी शासनाच्या दोन खात्यांना वेगवेगळे दर कसे दिले हा प्रश्न असल्याने महाग दराने संगणक घेऊ नयेत, अशी शिफारस सचिवांनी केली असल्याचे समजते. निविदा प्रक्रिया राबविणाऱ्या संचालकांनी आपल्या पातळीवर निर्णय न घेता खरेदीबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त मुख्य सचिव व मंत्र्यांकडे पाठविला आहे.ही फाइल तावडे यांच्या मंजुरीसाठी प्रलंबित असून त्यांनी महागडय़ा दराने संगणक खरेदी करण्यास मंजुरी दिलेली नाही.