मुंबईकरांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याचा संकल्प महापौर सुनील प्रभू यांनी ‘व्हिजन २०१३’मध्ये सोडला आहे.
नवीन वर्षांमध्ये महापालिकेची सर्व कार्यालये कागदविरहित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच मुंबईकरांच्या सहभागाने नवीन विकास आराखडय़ास सर्वोच्च प्राधान्य देऊन तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर नव्याने बांधलेल्या मध्य वैतरणा धरणातून दररोज ४५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मुंबईकरांना नव्या वर्षांत मिळावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी ‘व्हिजन २०१३’मध्ये स्पष्ट केले.
मालमत्ता कर सुधारणांतर्गत भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली राबविणे, कूपर रुग्णालयाचे आधुनिकीकरण, घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, झोपडपट्टीवासियांसाठी ‘प्रबोधन’ योजना अधिक प्रभाविपणे राबविणे, उत्कृष्ट रस्ते, मोकळ्या जागांचा विका, ६ ते १४ वयोगटांतील मुलांसाठी शिक्षणाच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याचा संकल्प आयुक्तांनी ‘व्हिजन २०१३’च्या माध्यमातून सोडला आहे.